Pune Crime Branch News | घरफोडी करणार्‍या चोरट्याला पकडून 3 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखेच्या युनिट 4 ची कामगिरी

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | धनकवडी (Dhankawadi) येथील एका गाडीत वाट पहात बसलेल्या चोरट्याला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. (Arrest In Theft Case)

शिवासिंग आमिरसिंग बावरी (वय २४, रा. कामतघर, भिवंडी, जि़ ठाणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक येरवडा परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार भरत गुंडवाड, देविदास वांढरे, वैभव रणपिसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धनकवडीतील चैतन्यनगर येथील संगमवाडी ट्रॅव्हर पार्किंगजवळ एका गाडीमध्ये बसून शिवासिंग बावरी हा कोणाची तरी वाट पहात आहे. त्यानुसार पोलीस पथक तातडीने संगमवाडी ट्रॅव्हल पार्किंग परिसरात शोध घेऊ लागले. तेव्हा एका गाडीत बसलेला शिवासिंग त्यांना दिसला. त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime Branch News)

त्याच्याकडे चौकशी करता त्याने विजयसिंग जुनी (रा. पिसवली, कल्याण) व त्याच्या आणखी एका मित्रासोबतीने सोबतच्या गाडीतून घरफोडी केल्याचे सांगितले. सहकारनगर पोलीस ठाण्यात या घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ५ लाख रुपयांची गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. त्यांच्याकडून सहकारनगर, मार्केटयार्ड, नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. शिवासिंग बावरी हा मुंबई येथे १० ते १२ गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. अधिक तपासासाठी त्याला सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, दिगंबर चव्हाण, सहायक फौजदार प्रविण राजपुत, यस्मीन सय्यद, पोलीस अंमलदार हरिष मोरे, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, प्रविण भालचीम, संजय आढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, एकनाथ जोशी, नागेशसिंग कुंवर, जहांगिर पठाण, मनोज सांगळे, वैभव रणपिसे, देविदास वाढंरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, भरत गुंडवाड, विशाल ईथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, चालक सहायक फौजदार शितल शिंदे यांनी केली आहे़.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed