Pune Crime Branch News | चोरट्याकडून मोबाईल चोरीचे चार गुन्हे उघडकीस

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | बाहेरगावाहून आलेल्यांना गाठून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने (Robbery Case) हिसकावून घेणार्‍या चोरट्याला पकडून ४ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला यश आले आहे. (Arrest In Mobile Theft Case)

रामू भिमराजू आवला (वय ३२, रा. शहापुरा, थाना आस्का, जि़ गंजम, ओडिशा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ७२ हजार रुपयांचे ४ मोबाईल जप्त केले आहेत. (Pune Crime Branch News)

पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात प्रवाशांकडून मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक पुणे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे व पुष्पेंद्र चव्हाण यांना एक जण संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील मोबाईल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत त्याने ४ मोबाईल चोरल्याचे कबुल केले. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे ३ आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS),
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP), सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे (Ganesh Ingle ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Pratap Mankar PI), सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (Amol Rasal API), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole), पोलीस अंमलदार नेवसे, जाधव, मोकाशी, कुंभार महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे, शिंदे व चव्हाण यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव