Pune Crime Branch News | हडपसरमधून 13 लाखांचे मॅफेड्रॉन हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला केली अटक

Pune Crime Branch (1)

पुणे : Pune Crime Branch News | दुचाकीवरुन अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ५८ ग्रॅम मॅफेड्रोन (एम डी) हस्तगत केला आहे.

https://www.instagram.com/reel/DHvcwxmp5Fs/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह (वय ३३, रा. राजतारा कॉम्प्लेक्स, लक्ष्मी कॉलनी, सोलापूर रोड) असे या तस्कराचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सय्यद साहील शेख यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी दुचाकीवरुन जाणार्‍या मोहम्मद शाह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५८ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात एन डी पी एस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख, संदिप शेळके, चेतन गायकवाड, संदिप जाधव, उदय राक्षे, रवींद्र रोकडे, मयुर सूर्यवंशी, निती जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

You may have missed