Pune Crime Branch News | पुणे: रायझिंग गँगमधील दोन तडीपार गुंडांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

Tadipar-pune Police

पुणे : Pune Crime Branch News | खुन, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांमुळे तडीपार केलेल्या रायझिंग गँगमधील दोन गुंड तडीपारीचा भंग करुन शहरात आले होते. खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) या दोघांना जेरबंद केले आहे. (Tadipar Criminal Arrested)

सनी रणजित टाक (वय २८, रा. एएफएमसी कॉटर्स, वानवडी) आणि नावेद शराफत शेख (वय २९, रा. फॉरेनर कॉटर, वानवडी) या या गुंडांची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार व त्यांचे सहकारी परिमंडळ ५ मध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना वानवडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील रायझिंग गँगमधील तडीपार गुन्हेगार पुणे शहरात रहात असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी तडीपारीचा भंग करुन शहरात आलेल्या दोघा गुंडांना अटक केली आहे. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस अंमलदार सुनील पवार, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसळकर, अमोल गावटे, आदिनाथ येडे, अमोल राऊत, पवन भोसले, गणेश खरात यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PI Girish Sonawane | निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकरच्या 500 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ताबाबत सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता सुवर्ण पदक पोलीस निरीक्षक गिरीष सोनावणे यांना जाहीर

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश

You may have missed