Pune Crime Branch News | पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला येरवडा भागातून 13 किलो गांजा जप्त (Video)

पुणे : Pune Crime Branch News | येरवडा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त केला आहे. (Arrest In Ganja Case)
जगदीश भवानसिंग बारेला (वय १८, रा. दहिवत, अंमळनेर, जि. जळगाव)आणि पवन सुभाष बारेला (वय २२, रा. कलकुंटी, जि. बरवानी, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार संदीप शेळके यांना येरवड्यात गांजा विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. दरम्यान, लष्कर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा परिसरातून अटक केली. नदीम मेमन उर्फ इब्राहिम अल्ताफ कच्छी (वय २५, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, संदीप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी यांनी केली.