Pune Crime Branch News | सणसवाडी येथे खून केल्यानंतर 2 वर्ष पोलिसांना गुंगारा देणार्यास गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडून जेरबंद
पुणे : Pune Crime Branch News | शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) हद्दीतील सणसवाडी येथे दोन वर्षांपूर्वी खून (Abscond In Murder Case) करुन फरार झालेल्या व पोलिसांना गुंगारा देणार्यास शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत (वय२३, रा. सणसवाडी, ता. शिरुर) असे आरोपीचे नाव आहे. धनराज शेरावत याने गोपाळ महादेव लुडकर (रा. सणसवाडी) यांचा सणसवाडी परिसरात २०२२ मध्ये खून केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांना त्याने सतत गुंगारा दिला होता. युनिट ५ च्या पथकाला तो सणसवाडी -तळेगाव रोडवरील (Sanaswadi Talegaon Road) अमरधाम स्मशानभूमीजवळ आला असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी त्याला पकडले. त्याची ओळख पटवून पुढील तपासासाठी त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर,
पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले,
पृथ्वीराज पांडुळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शशिकांत नाळे,
अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी, शुभांगी म्हाळशेकर यांच्या पथकाने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा