Pune Crime Branch News | पुणे : गुलटेकडी परिसरात सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसासह अटक

पुणे : Pune Crime Branch News | गुलटेकडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीवरुन गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून पिस्टल व काडतुस जप्त केले आहे. (Pistol Seized)
ओंकार बाळु मावास (वय २१, रा. गुलटेकडी, डायस प्लॉट, मार्केटयार्ड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक २० फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की, डायस प्लॉट येथील कॅनॉलजवळ एक जण शस्त्र घेऊन थांबलेला आहे. या बातमीप्रमाणे पोलीस पथक डायस प्लॉट येथे गेले. त्यांनी संशयित ओंकार मावास याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ४० हजार ४०० रुपयांचा माल मिळाला. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Criminal Arrested Who Caryy Pistol)
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना ताम्हाणे, विजय पवार, पुष्पेंद्र चव्हाणव नागनाथ राख यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण