Pune Crime Branch News | पुणे: सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल, 2 काडतुसे हस्तगत; गुन्हे शाखेने कात्रज रोडवर सोहम वाघमारेच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | खुनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Murder) गुन्हा असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने पिस्टल व २ काडतुसे जप्त केले आहे.

सोहम शशिकांत वाघमारे Soham Shashikant Waghmare (वय २०, रा. तळजाई वसाहत, सहकारनगर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव यांना ११ जानेवारी रोजी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज रोडवरील मस्तान हॉटेलजवळ एक जण पिस्टल घेऊन येणार आहे. ही बातमी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी मस्तान हॉटेलजवळ सापळा रचून सोहम वाघमारे याला पकडले. त्याच्याकडून ४८ हजार ८०० रुपयांचे एक पिस्टल व दोन काडतुसे जप्त केली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहन वाघमारे याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमंत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे, विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed