Pune Crime Branch News | पुणे: ‘छावा’ सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या सराईतांवर पोलिसांचा ‘गनिमा कावा’; मोक्का आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्यांच्या पोलिसांनी वैभव टॉकीज परिसरातच मुसक्या आवळल्या

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची देशभर चांगलीच हवा आहे. ‘छावा’विषयीच्या उत्सुकतेने 2 फरार गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. मोका आणि दरोड्याची तयारी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले. (Criminal Arrested Who Abscond In MCOCA)

धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग ऊर्फ धरम्या सुरजिसिंग भादा (वय २२, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय २३, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी तयारीत असताना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सापळा रचून दोघा तडीपार गुन्हेगारांसह तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य, वाहने असा १ लाख ८० हजारांचा माल जप्त केला होता. त्यावेळी बादशाहसिंग भोंड हा पळून गेला होता. तेव्हापाासून तो फरार होता.

दिघी येथील शिव कॉलनीत खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलिसांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी रस्त्याच्या कडेला गांजा विक्रीसाठी थांबलेल्या सुरजितसिंग गजलसिंग भादा (वय ३८, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) याला पकडून त्याच्याकडून ५२ हजार ८१५ रुपयांचा १०५२ ग्रॅम गांजा जप्त केला होता. हा गांजा कोणाकडून आणला याची चौकशी केल्यावर त्याने त्यांचा मुलगा अर्जुनसिंग भादा व भगतसिंग भादा यांनी मंगलसिंग पोलादसिंग भोंड याच्याकडून आणल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक २२ फेब्रुवारीला कोंबिग ऑपरेशन करीत असताना पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांना मोका व दरोड्याच्या तयारीतील फरार आरोपी वैभव टॉकीज येथे येणार आहेत, अशी बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धर्मेनसिंग भादा आणि बादशाहसिंग भोंड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग निश्चित झाल्याने पुढील तपासासाठी त्यांना दिघी पोलिसांच्या हवाली केले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed