Pune Crime Branch News | दाखवायला व्यवसाय गॅस रिपेरिंगचा, करत होते अमली पदार्थांची विक्री; दोघांकडून २२ लाखांचा एमडी जप्त

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | गॅस रिपेरिंगचा व्यवसाय (Gas Repairing) करणार्‍या दोघांना पकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) त्यांच्याकडून २१ लाख ३८ हजार रुपयाचा १०६ ग्रॅम एमडी (MD), दुचाकी, मोबाईलसह २२ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय २२) आणि महेश पुनारा बिश्नोई (वय २०, दोघे रा. तुळजाभवानी नगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही गॅस रिपेरिंगचे काम करतात. ते मुळचे राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. श्रवणसिंग याच्याकडून ५३ ग्रॅम तर महेश याच्याकडून ५३ ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime Branch News)

अंमली पदार्थ विरोधी पथक भारती विद्यापीठ परिसरात सोमवारी गस्त घालत असताना हवालदार चेतन गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कात्रज तलाव मेन गेटसमोर एम डी विक्री करणार्‍यासाठी एक व्यक्ती येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एम डी ड्रग्ज आढळून आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड (PI Pandit Rejitwad),
पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलिस उप निरीक्षक शिवाजी घुले,
पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संतोष देशपांडे, रवींद्र रोकडे, प्रशांत बोमादंडी, साहिल शेख,
संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर, संदीप शेळके, नितीन जगदाळे, अझीम शेख,
युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद