Pune Crime Branch News | महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाविणारा जेरबंद ! पाच गुन्हे उघडकीस, गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी
पुणे : Pune Crime Branch News | महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाविणार्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले. त्याच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. (Chain Snatcher Arrested)
जितु बारीसाहब राजपुत (वय२७, रा. वाजेवाडी, ता़ शिरुर) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार जितु राजपुत हा सोन्याचे दागिने विकण्यासाठी ससाणेनगर येथे येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी पांढरे मळा येथे सापळा लावून राजपुत याला पकडले. त्याने साथीदाराबरोबर फुरसुंगी, हडपसर, बी टी कवडे रोड, देवाची उरुळी परिसरात एकट्या जाणार्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसका मारुन चोरुन नेले आहेत. ते दागिने विकण्याकरीता तो आला होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा ३ लाख ९५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याने व साथीदार अनिरुद्ध नानावत यांनी दोघांनी मिळून विविध पोलीस ठाण्यात दाखल ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma IPS),
अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (Nikhil Pingle DCP),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (Satish Govekar ACP)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे (Yuvraj Hande PI), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (Krishna Babar API),
पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निभोरे, विनोद शिवले,
तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे शुभांगी म्हाळशेकर, पृथ्वीराज पांडुळे,
शशिकांत नाळे, अकबर शेख, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, व उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Warje Malwadi Pune Crime News | ‘गाडी नीट चालवता येत नाही’ म्हणून तिघांनी केली दोघा भावांना मारहाण