Pune Crime Branch News | तडीपार गुंड चोरीची दुचाकी घेऊन घरी आला आणि पोलिसांच्या जाळयात फसला

Tadipar-pune Police

पुणे : Pune Crime Branch News | पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात प्रवेश करुन चोरीच्या दुचाकीवरुन घरी आलेल्या गुंडाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने पकडले. (Tadipar Criminal Arrested)

सोहम प्रकाश डोंगरे Soham Prakash Dongre (वय २४, सध्या रा. गणराज सोसायटी, पाषाण, मुळ रा. सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाणगाव) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक कोंबिंग ऑपरेशनमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमित गद्रे व महेश पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चतु:श्रृंगी पोलिसांकडील रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला सोहम प्रकाश डोंगरे हा पाषाणमध्ये त्याच्या घरी येणार आहे. या माहितीनुसार पोलिसांनी बातमीचे ठिकाणी जाऊन सापळा लावला. पाषाण येथील वीटभट्टी शेजारी एक जण मोपेड सह उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. सोहम डोंगरे याच्याकडील दुचाकीच्या नंबरविषयी शंका आल्याने पोलिसांनी दुचाकीविषयी विचारले. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले़ वेस्पा मोपेडच्या चासीचा नंबर पडताळून पाहिला. तेव्हा ही मोपेड वाकड परिसरातून २०२३ मध्ये चोरीला गेल्याचे व वाकड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. सोहम डोंगरे हा मोपेड चोरुन तिची नंबर प्लेट बदलून तिच्यासह तडीपारीचा भंग करुन पाषाणमध्ये घरी आला होता.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, गणेश ढगे, अजित शिंदे, रवींद्र लोखंडे, महेश पाटील, नारायण बनकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed