Pune Crime Branch News | कल्याणीनगर ते रांजणगाव सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरटे जेरबंद ! सेंट्रींगच्या कामगारांचे कृत्य, बुटिकमधील महागड्या शर्टची चोरी उघड
पुणे : Pune Crime Branch News | कल्याणीनगर येथील नामवंत बुटिकची खिडकी तोडून त्यातून महागडे डिझायनर शर्ट चोरीचा तपास करताना पोलीस कल्याणीनगरपासून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत थेट रांजणगाव येथील संकल्प सिटीपर्यंत पोहचले. तेथून तिघा चोरट्यांना पकडले.
विवेक ऊर्फ गुरुदेव मणीराम राजपूत (वय ३०), अभिषेकसिंग ऊर्फ प्रदिप पप्पुसिंग (वय २५) आणि अमितसिंग विजयसिंग (वय ३१, तिघे रा. संकल्प सिटी, मानवी अपार्टमेंट, रांजणगाव मुळ बबेरु, जि. बांधा, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून या बुटिकमधून चोरुन नेलेली रोकड, दोन शर्ट, एक लेडीज ड्रेस, मोटारसायकल असा १ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. हे तिघेही कामगार असून सेंट्रींगचे काम करतात.
कल्याणीनगरमधील संम्राट सोसायटीत निवेदिता साबु यांचे बुटिक आहे. या बुटिकची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व रोख रक्कम ६ नग कपडे असा १ लाख ९९ हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस हवालदार हरीश मोरे, पोलीस अंमलदार देवीदास वांढरे तसेच येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुशांत भोसले व पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे या पथकाने घटनास्थळ व आजूबाजूचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी करत होते. त्यात काही संशयित दिसले. त्यांची पाहणी करत ते रांजणगावपर्यंत गेले. गणेगाव रोडवरील संकल्प सिटी इथपर्यंत त्यांनी माग काढला. तेथील स्थानिक नागरिकांना संशयितांचे फोटो दाखविले. हवालदार हरीश मोरे, पोलीस अंमलदार देवीदास वांढरे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, हे फोटोतील संशयित संकल्प सिटीमधील मानवी अपार्टमेंटमध्ये भाड्याने रहात आहेत. त्यानुसार पोलीस रांजणगाव येथे पाळत ठेवून थांबले. गुरुवारी १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता तिघे जण मोटारसायकलवरुन मानवी अपार्टमेंटजवळ आले. आपले लक्ष्य आल्याने दिसताच पाळतीवर थांबलेल्या पोलिसांनी झडप घालून तिघांना पकडले. त्यांच्याकडील मोटारसायकल, दोन शर्ट, एक लेडीज ड्रेस, रोख रक्कम असा १ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला.
याबाबत पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाला काही संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दुचाकी आणि हे फुटेज यावरुन शोध घेत पथक गणेगाव येथे पोहचले. तेथील लोकांनी सीसीटीव्ही फुटेजमधील लोकांना ओळखून ते मानवी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे सांगितले. तेथे त्यांची गाडी दिसल्याने आरोपींची ओळख पटली. (Pune Crime Branch News)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त निखि पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ट पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदुम, स्वप्नील पाटील,
पोलीस अंमलदार हरीश मोरे, प्रविण भालचिम, संजय आवारी, विशाल गाडे एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर, विनोद महाजन,
जहागीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, देविदास वांढरे, विशाल इथापे, मनोज सांगळे, सुशांत भोसले व प्रशांत कांबळे यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन