Pune Crime Branch News | दुचाकी चोरणार्‍या आरोपींकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

pune-police-arrest

पुणे : Pune Crime Branch News | दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने रविवार पेठेतून दोघा चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. प्रणव प्रकाश ठाकूर (वय २४, रा. रविवार पेठ) आणि अजय दत्तात्रय कुमकर (वय २५, रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Vehicle Theft Detection)

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजित शिंदे व अमित गद्रे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रविवार पेठेत दोघे संशयित चोरीच्या गाडीसह थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस रविवार पेठेत गेले. तेथे दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी ही रविवार पेठेतून चोरल्याचे आढळून आले. अधिक चौकशीत त्यांनी आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. फरासखाना व समर्थ पोलीस ठाण्यातून चोरीला गेलेल्या दोन दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले असून ९० हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या.

ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed