Pune Crime Branch News | गुंडाकडून दोन पिस्टल, 2 काडतुसे हस्तगत ! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी

pune-police-arrest

पुणे : Pune Crime Branch News | पिस्टल विक्रीसाठी आलेल्या गुंडाची माहिती मिळवून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने त्याच्याकडून २ पिस्टल व २ काडतुसे जप्त केली. (Pistol Seized)

बाबु बळीराम हरणे Babu Baliram Harne (वय ४१, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे या गुंडाचे नाव आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार हे त्यांच्या सहकार्‍यांसह गस्त घालत होते. सहायक पोलीस फौजदार आटोळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, एका जण पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. बातमीनुसार पोलिसांनी कोंढव्यातील पारसी मैदान येथे सापळा रचला. बाबु हरणे तेथे आला. पोलिसांनी त्याला पकडले. अंगझडतीमध्ये २ देशी बनावटीचे पिस्टल व दोन काडतुसे असा ८० हजार ४५० रुपयांचा माल जप्त केला.

बाबु हरणे याने फिरोज खान याच्यासमवेत खडी मशीन चोरी केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल होता. या चोरीच्या गुन्ह्यातील फिरोज खान (वय ३९, रा. भारत कॉलनी, हांडेवाडी रोड, हडपसर) हा मिळून आल्याने त्याला अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed