Pune Crime Branch News | तामिळनाडुहून मुंबई जाणार्‍या तरुणाचे पुण्यात अपहरण; 6 जणांना अटक, सुटका केल्यावर वेगळेच कारण आलं समोर

Pune Crime Branch

पुणे : Pune Crime Branch News | तामिळनाडुहून मुंबई जात असताना पुण्यात तरुणाचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्यांना हॉटेलमध्ये डांबुन ठेवण्यात आले होते. या तरुणाने आपल्या तामिळनाडु येथील नातेवाईकांना कळविले. त्यांनी पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे (DCP Nikhil Pingle) यांना कळविले. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने या तरुणांचा शोध घेऊन सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेल येथून या तरुणाची सुटका केली. त्यांचे अपहरण करणार्‍या ६ जणांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर हा तरुण आणि आरोपी हे दोघेही पिडित असून फसवणुकीचे शिकार झाले आहेत, असे दिसून आले.

मोहम्मद फर्मान मेहेरबान (वय २७, रा. नरुलापूर, बिजनोर, उत्तर प्रदेश), अर्जुन कुमार शिवकुमार (वय २८, रा. नरुलापूर, बिजनोर, उत्तर प्रदेश), देवेंद्र सुनिल अलभर (वय २५, रा. देवपैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), अंकित अर्जुन अडागळे (वय २५, रा. पवई आयआयटी मार्केट, मुंबई), अविनाश दत्तात्रय कदम (वय ४३, रा. शिक्रापूर मलटण फाटा, शिक्रापूर), प्रियांक राणा देवेंद्र राणा (वय ३३, रा. न्यू आदर्शनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत व्यंकटेश सुब्रम्हण्यम (वय ३५, रा. तिरुवन्नामलाई, तामिळनाडु) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनांन्स प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर रमेश यांनी व्यंकटेश सुब्रम्हण्यम यांना नोकरी दिल्याचे सांगितले. दुसरीकडे रमेश यांनी आरोपींना आमच्या कंपनीमध्ये गुंतवणुक करा असे सांगितले. त्यानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील हे आरोपी गुंतवणुक करण्यास तयार झाले. तेव्हा रमेश याने व्यंकटेश यांना तुम्हाला नोकरी देतो, तुमचे पहिले काम या लोकांकडे जाऊन पैसे घ्या आणि ते माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर करा. व्यंकटेश आणि आरोपी या दोघांनी रमेश याची कधी भेट घेतलेली नाही. व्यंकटेश हे मुंबईला गेले. त्यांनी या लोकांकडून पैसे घेतले.

ते रमेश यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. ६ जानेवारी हा सर्व व्यवहार झाला. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर रमेश हा मोबाईल बंद करुन पसार झाला. त्यामुळे आरोपींना संशय आला की हाही त्यांना मिळाला आहे. त्यांनी व्यकंटेश याला मुंबईला बोलावले. त्याचे पुण्याजवळ अपहरण करुन त्याला सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलमध्ये व्यंकटेश याला मारहाण करुन डांबुन ठेवले. त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन हे कळविले. त्यानंतर ९ जानेवारी रोजी त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली. पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन सुटका केली. ६ जणांना अटक केली.

हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करुन दरोडा व वाहन चोरी पथकाने सहा जणांना हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात सर्वांना दिले. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी व्यंकटेश आणि आरोपी हे दोघेही पिडित असून दोघांना रमेश याने फसविले असल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, संदिपान पवार, युवराज हांडे, पठाण, सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, तसेच युनिट ५ व ६ च्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed