Pune Crime Branch | पिंपरी : खुन व मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या सख्ख्या भावांना गुन्हे शाखेकडून अटक

Pimpri Chinchwad Crime Branch

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार (Koyta Attack) करुन त्याचा खून (Murder In Pimpri) करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) आणि आळंदी (Alandi) परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या इतर साथीदारांना यापूर्वी अटक केली होती. दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यात आरोपींवर मोक्का कारवाई (Pimpri Chinchwad Police MCOCA Action) करण्यात आली आहे.

गणेश बाजीराव ढमाले Ganesh Bajirao Dhamale (वय-36) व अभिजित उर्फ ओंकार बाजीराव ढमाले (वय-29 रा. जुनी सांगवी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 1 मे रोजी औंध-रावेत बीआरटी रोडवर दुचाकी वरुन आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार करुन खून केला. खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. तर त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपी अभिजीत ढमाले हा टोळी प्रमुख आहे. (Pune Crime Branch)

अभिजीत ढमाले व त्याच्या साथीदारांवर 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याने टोळीवर वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेत असताना गणेश याला तळेगाव दाभाडे तर अभिजित याला आळंदी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. (Pune Crime Branch)

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर
यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत,
पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब किरनाळे, नारायण जाधव, सहायक फौजदार संजय गवारे, आदिनाथ मिसाळ,
पोलीस अंमलदार प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे,
वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे,
तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल