Pune Crime Branch | पिंपरी : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवणारा परप्रांतीय गजाआड, दरोडा विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड शहरात रस्त्याने एकट्या पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या (Chain Snatching In Pimpri Chinchwad) परप्रांतिय आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने (Anti Dacoity Squad Pimpri) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून दोन चैन चोरीचे तर एक वाहन चोरीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Chain Snatcher Arrest)
मोनुकुमार लल्लन बिंद (वय-26 रा. पवार वस्ती चिखली, मुळ रा. सोनहरिया ता. गाझीपुर जि. गाजीपुर उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) मंगळवारी (दि.16) फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला नेवाळे वस्ती येथून घरी जात असताना एका दुचाकीस्वाराने समोरुन विरुद्ध बाजूने येऊन गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरून नेले होते. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. (Pune Crime Branch)
चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. दरोडा विरोधी पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील 125 ते 150 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच आरोपीचा येण्याचा व जाण्याचा मार्ग काढला असता, संशयित चिखली परिसरात भरदिवसा एकटा गुन्हे करत असल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने कुदळवाडी व चिखली परिसरात आरोपीचा दोन दिवस शोध घेतला.
पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस शिपाई समीर रासकर, अमर कदम यांना एक जण संशयीतरित्या विनानंबर प्लेट स्प्लेंडर दुचाकीवरुन कुदळवाडी परिसरात येताना दिसला. त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील दुचाकी बाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीकडे चैन चोरीबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,
पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे,
आशिष बनकर, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर यांच्या पथकाने केली. (Pune Crime Branch)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन