Pune Crime Court News | पुणे : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले, आरोपीला 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा
पुणे : Pune Crime Court News | शाळेत गेलेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) पळवून नेल्याची घटना पुणे शहरात 2011 साली घडली होती. या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरवडे (Judge S. R. Narwade) यांनी सुनावला. यामध्ये आरोपी तरुणाला न्यायाधीशांनी सहा महिने सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Pune Crime Court News)
दंड न भरल्यास 3 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, तसेच दंडातील रकमेपैकी 10 हजार रुपये मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. विनोद उर्फ विनायक सुरेश चव्हाण Vinod aka Vinayak Suresh Chavan (वय 20, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 22 ऑक्टोबर 2011 रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी शाळेत कार्यक्रम असल्याचे सांगून बाहेर पडली होती. ती रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने पालकांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता शाळेत कोणताही कार्यक्रम नसल्याचे समजले.
ही शोधाशोध सुरू असतानाच अचानक मुलीनेच पालकांना मोबाईलवर संपर्क साधला आणि म्हटले की, मी नाशिकला आहे, चार दिवसांनी परत येईन. पालकांनी पुन्हा तिला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तो बंद होता. त्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास करून विनोद उर्फ विनायक सुरेश चव्हाणला अटक केली. चौकशीत चव्हाणने मुलीला विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघड झाले.
यानंतर पोलिसांनी चव्हाणविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील संजय पवार यांनी चार साक्षीदारांची साक्ष नोंदविली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने चव्हाणला शिक्षा सुनावली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन