Pune Crime Court News | पॉस्कोच्या गंभीर गुन्ह्यातून आरोपीला जामीन मंजूर

पुणे : Pune Crime Court News | अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश श्रीमती एस. बी. राठोड (Judge S B Rathod) यांनी आरोपी इर्फान मुजावर याची लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील गु. २.नं. ४४९/२०२३ भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६-बी, ५०६ आणि ४५२ आणि पॉस्को कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्ह्यातील आरोपीस गुन्हेगारांस सशर्त जामीन मंजूर केला आहे
सदर कामी थोडक्यात हकीकत की, घटनेच्या तारीख व वेळी आरोपी क्र. १ व २ यांनी संगणमत करुन फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय १७ वर्षे हिस आरोपी क. १ याने ‘मी जर तुझ्या रुम मध्ये आलो, तर तु आवाज करायचा नाही, आवाज केला तर मी तूला मारुन टाकेन आणि तुझ्या घरच्यांना पण मारून टाकेन’ अशी धमकी देऊन फिर्यादीचे रुममध्ये जबरदस्तीने घुसून आरोपी क. २ याने पिडीत मुलीचे हात धरुन आरोपी क. १ याने बळजबरीने तिचे इच्छेविरुध्द शरीरसंबंध केले. त्यानंतर आरोपी क. १ याने पिडीत मुलीचे दोन्ही हात धरले व आरोपी क. २ याने तिचे इच्छेविरुध्द बळजबरीने शरीर संबंध केले. नंतर वेळोवेळी दोन्ही आरोपी परत पिडीत मुलीचे घरी येऊन तिचेशी आळीपाळीने बळजबरीने शरीरसंबंध केले आहे म्हणून आरोपीतांनी भादंवि कलम ३७६,३७६ (२) (१), ३७६ (ड), ५०६,४५२ लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा केला म्हणून त्यांचे विरूध्द काळभोर पोलीस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला.
आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात घुसून बलात्कर (Rape Case) केला होता त्यामुळे पिडीत व्यक्तीने लोणीकाळभोर येथील पोलीस स्टेशन येथे आरोपी विरूध्द फिर्याद नोंदविली.
सरकार पक्षाने सदर जामीन मंजूरी तीव्र विरोध केला. त्यामध्ये त्यांनी सदरील आरोपी विरूध्द गंभीर स्वरूपाचा गन्हा असून त्यांचा पूर्वीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. आरोपीला जामीन मंजूर केल्यास ते सरकारपक्षवर व साक्षीदारांवर दबावतंत्राचा वापर करतील ते पळून जाण्याची शक्यता आहे, तसेच ते अज्ञान पिडीत मुलीवर दबाव तंत्राचा वापर करतील. असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.
परंतू आरोपी तर्फे अॅड. सिध्दांत मालेगांवकर यांनी युक्तिवाद करताना सदरील आरोपी क. १ यास जामीन मंजूर झालेला असून सदरील आरोपी हा पॅरीटी / समन्यायीक तत्वावर जामीन मिळण्यास पात्र आहे, आरोपी यांचेवर पूर्वी कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नाहीत, तसेच आरोपी यांचे विरूध्द प्रथमदर्शनी केस नाही, तसेच आरोपी यांचेकडून कोणत्याही प्रकारची जप्ती करावयाची राहीलेली नाही. तसेच आरोपी यांचे वकीलांनी मे. उच्च न्यायालयाचे वय १६ वर्षाबाबतचे सर्व न्यायनिवाडे दाखल केले. ते मे. कोर्टच्या हुकूमाप्रमाणे प्रत्येक अटी व शर्तीचे पालन करतील तसेच संबंधित साक्षीदाराला अडथळा अथवा संपर्क करणार नाहीत. त्यांना सदरील गुन्ह्यामध्ये खोट्या पध्दतीने अडकविण्यात आलेले आहे. त्यामुळे सदरील आरोपी यांना जामीन मंजूर करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आरोपी हे मे. कोर्टाचे हुकूमाचे तंतोतंत पालन करतील.
सदरील आरोपी तर्फे “मालेगांवकर अँड असोसिएट्स” (Malegaonkar and Associates) चे अॅड. सिध्दांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिलेला युक्तिवाद महत्वाचा ठरला व तो मे. कोर्टाने मान्य करून मे. कोर्टाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.
सदर कामी आरोपी तर्फे “मालेगांवकर अँड असोसिएट्स” चे अॅड. सिध्दांत मालेगांवकर, अॅड. प्रेरणा बावीस्कर, अॅड. आकाश मायने, अॅड. अभिषेक चौधरी व अॅड. अमोल घावटे यांनी काम पाहीले. (Pune Crime Court News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा