Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

court danduka

पुणे : Pune Crime Court News | विशेष जिल्हा न्यायाधीश के. पी. क्षीरसागर (Judge K. P. Kshirsagar) यांनी एका नामांकित बॅंकेचा कर्मचारी प्रितमकुमार सुरेंद्र गुप्ता Pritamkumar Surendra Gupta ( २६, रा. विश्रांतवाडी, दिघी रोड, पुणे) याला एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवून तीचा पाठलाग करून तीला तीचा मोबाईल नंबर मागितला व तीचा विनयभंग (Molestation Case) केला. या प्रकरणी जामीन मंजूर केला.

दि.२१ जुन २०२४ रोजी पिडित अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहीणीला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी गुप्ता याने त्या दोघींचा पाठलाग केला. परंतु पिडित अल्पवयीन मुलीला वाटले त्याचे दुसरे काही तरी काम असेल, परंतु मुलीला संशय आल्याने त्या मुलाच्या दुचाकी गाडीच्या नंबरचा फोटो तिच्या मोबाईल मध्ये काढून ठेवला होता.

दि.२४ जुन २०२४ रोजी पुन्हा पिडित अल्पवयीन मुलगी नेहमी प्रमाणे तीच्या लहान बहिणीला शाळेतून घरी घेऊन जात असताना तोच मुलगा तीचा पाठलाग करिता आला. थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर त्या मुलाने पिडित अल्पवयीन मुलीचा जाण्याचा रस्ता अडवून तीला म्हणाला “आप क्या करते हो, आप बच्चे को लेने को स्कुल जा रहे है ना, आपको गाडी पे छोडु क्या, त्यावर ती मुलगी नाही म्हणाली व घाबरून पुढे चालत राहिली. ती थोडी पुढे गेल्यावर पुन्हा आरोपी गुप्ताने तीचा रस्ता अडवून म्हणाला “मैं आपको छोड देता हूं, तेव्हा ती अल्पवयीन मुलगी पून्हा नाही म्हणाली.

ती अल्पवयीन पिडित मुलगी घाबरून पुढे चालतच होती, तरीही आरोपी गुप्ता तीचा पाठलाग करितच होता. पुन्हा गुप्ताने तीचा रस्ता अडवून तीला म्हणला की, “तुम मुझे अच्छे लगते हो, आपका मोबाईल नंबर मुझे दे दो, असे म्हणाल्यावर ती मुलगी आरोपी गुप्ताला म्हणाली ” मैं मेरा मोबाईल नंबर नही दूंगी, मैं आपको जानती नहीं” असे म्हणाल्यावर आरोपीच्या दुचाकी गाडीच्या नंबरचा फोटो काढला तेव्हा लगेच आरोपीने तेथून पळ काढला. घरी गेल्यावर त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तीच्या आईला सांगितला.

पिडित अल्पवयीन मुलीची आई व पिडीत मुलगी यांनी आरोपीच्या दुचाकी गाडीचा नंबर निगडी पोलीसांना देऊन अनोळखी इसमा विरूद्ध फिर्याद दिली. (Pune Crime Court News)

निगडी पोलिसांनी (Nigdi Police) नंतर दुचाकी गाडीच्या नंबर वरून RTO कार्यालयातून (RTO Office) आरोपीचा पत्ता मिळवून आरोपीचा शोध घेऊन आरोपी गुप्ताला निगडी पोलिसांनी दि.२५/०६/२०२४ रोजी अटक केली होती. तेव्हापासून आरोपी गुप्ता हा येरवडा कारागृहात (Yerawada Jail) न्यायालयीन कोठडीत होता.

आरोपी गुप्ताच्या वतीने ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार (Adv. Harshvardhan Milind Pawar), ॲड.रूतुजा नाईक (Adv. Rutuja Naik) व ॲड. सारंग बहिरट (Adv. Sarang Bahirat) यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
ॲड. हर्षवर्धन पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला,
फक्त गाडीच्या नंबर वरून व फक्त संशया वरुन आरोपी गुप्ताला निगडी पोलीसांनी अटक केली आहे.
आरोपी गुप्ता एका नामांकित बॅंकेचा कर्मचारी आहे.
घटनास्थळी सीसी टिव्ही आहेत. परंतु त्याचे फुटेज पोलीसांनी जप्त केले नाहीत.
घटनांच्या दिवशी गुप्ताच गाडी चालवत होता हे तपासात निष्पन्न झालेले नाही.
जवळपास दीड महिन्यापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे.
ॲड. हर्षवर्धन पवार यांनी केलेला हा युक्तिवाद ऐकून आरोपी प्रितमकुमार गुप्ता
याला रुपये ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’

Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

You may have missed