Pune Crime Court News | पुणे महानगर पालिकेमध्ये महीलेस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जमीन मंजूर
पुणे: Pune Crime Court News | दि. २२/०८/२०२४ रोजी फिर्यादी पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation – PMC) आदिवासी मुलींसाठी बांधण्यात येण्याऱ्या वसतिगृहाचे कामकाजाची माहिती घेण्यासाठी गेले असता आरोपी परेश छबनराव गुरव (Paresh Chabanrao Gurav) यांनी फिर्यादी महिलेस जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग (Molestation Case) केला अशी फिर्याद शिवाजीनगर पोलिस स्टेशन (Shivaji Nagar Police Station) येथे दिली. त्याकामी आरोपीने मे. सत्र न्यायालयाकडे अँड. सिद्धांत मालेगावकर (Adv Siddhant Malegaonkar) यांचेमर्फत अटकपूर्व जामीनाकरीत धाव घेतली.
आरोपी हे फिर्यादी ह्या इतर लोकांशी संगनमत करून आदिवासी मुलींसाठी बांधण्यात येण्याऱ्या वसतिगृहाचे बांधकामामद्धे करत असलेला भ्रष्टाचार व गैरव्यावहार उघडकीस आणत असल्यामुळे व आरोपीने तसा रीतसर अर्ज महानगर पालिकेकडे दिला असल्याने फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे अँड. सिद्धांत मालेगावकर यांनी मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले. तसेच फिर्यादी यांनी पत्रकारांसमोर केलेल्या व्यक्तव्यामध्ये फिर्यादी यांनी स्वतः आरोपिस सँडलने मारहाण केल्याचे मान्य केले असल्याचे वृत्तपत्राचे कात्रण मे. कोर्टसमोर दाखल केले.
आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून व एफआयआर मध्ये कोठेही फिर्यादीचे जातीचा उल्लेख केलेल्या नसल्याने मे. एस. आर. नरवडे साहेबांनी आरोपिस अटकपूर्व जमीन मंजूर केला.
याप्रकरणी आरोपीच्या वतीने मालेगावकर अँड असोसिएटस चे अँड. सिद्धांत मालेगावकर यांचा युक्तिवाद महत्वाचा ठरला. तसेच अँड. प्रेरणा बावीस्कर, अँड. प्रमोद धुळे, अँड. आकाश मायने, अँड. शुभंकर मालेगावकर, अँड श्रद्धा जाधव, अँड कुणाल सोनवणी, अमोल घावटे, समर्जीत मोहोळ, अथर्व पिंगळे, यश देशमुख यांनी कामकाज पहिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’