Pune Crime Court News | सराईत गुन्हेगाराला चोरीच्या  गुन्ह्यात सहा महिने शिक्षा

Pune Crime Court News | Innkeeper sentenced to six months in theft case

पुणे : Pune Crime Court News | काही दिवस दुकानात काम केल्यावर दुकानातून चीजवस्तू चोरुन पळून जाणार्‍या सराईत गुन्हेगाराला न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली.

निलेश विष्णु कदम (वय ३१, रा. दुरशेत, ता. खालापूर, जि़ रायगड) असे या सराईत चोरट्याने नाव आहे.

आरटीझेन कॅफे या कॅफेमध्ये काम करणारा नोकर निलेश कदम हा कॅफेमधील दोन मोबाईल व १५ हजार रुपये असा २९ हजार रुपयांचा माल चोरुन पळून गेला होता. २४ ऑक्टोंबर रोजी बाणेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकातील पोलीस अधिकारी के बी  डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंग यांनी अंधेरी भागात शोध घेऊन निलेश कदम याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेला माल जप्त केला. पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयात सरकारी वकील शैला घोडेस्वार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार शंकर सोनवणे यांनी सहकार्य केले.

निलेश कदम याला यापूर्वी अशाच प्रकारे फरासखाना पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात ३ महिन्यांची शिक्षा झाली होती. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी चोरीच्या गुन्ह्यात ३ महिने तर आरोपीला पूर्वी चोरीचे गुन्ह्यात शिक्षा झालेली असतानाही पुन्हा गुन्हा केल्याने ६ महिन्यांची शिक्षा केली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस हवालदार शंकर सोनवणे, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, गजानन अवातिरक, शरद राऊत, रोहित पाथरुट, स्वप्नील मराठे यांनी केली आहे.

You may have missed