Pune Crime Court News | सासूच्या नावावरील जमीनसाठी पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेपेची शिक्षा

court dhandhuka

पुणे : Pune Crime Court News | सासूची जमीन नावावर करुन देण्यावरुन झालेल्या वादात पत्नीच्या डोक्यात फरशी मारुन तिचा खून करणार्‍या पतीला आजन्म कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याने सासूलाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला ७ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर (Judge K.P. Nandedkar) यांनी हा निकाल दिला आहे. (Attempt To Murder Case Kondhwa)

बाळासाहेब जनार्दन चव्हाण (वय ५०, रा. येवलेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी शालन हिचा त्याने खून केला होता़ तर सासू सुभद्रा विठ्ठल भोजने यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना येवलेवाडी (Yewalewadi) येथे १३ नोव्हेबर २०१५ रोजी घडली होती.

सुभद्रा भोजने यांच्या नावावर मंगळवेठा येथे पाच गुंठा जमी आहे़ त्यापैकी एक गुंठा जमीन आपल्या नावावर करावी यासाठी बाळासाहेब चव्हाण आपली पत्नी.शालन हिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून शालन ही माहेरी आईवडिलांकडे राहत होती. घटनेच्या दिवशी शालन आंघोळ करत असताना बाळासाहेब तेथे गेला व त्याने तिच्या डोक्यात फरशी घालून खून केला. सासूवरही वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime Court News)

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी १२ साक्षीदार तपासले.
त्यात प्रत्यक्षदर्शी दोन्ही मुलांची साक्ष महत्वाची ठरली़ सरकारी वकील मारुती वाडेकर
यांना कोर्ट पैरवी कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप, हवालदार माने, पोलीस शिपाई केंगले,
सहायक पोलीस उपनिरीक्ष गरुड, हवालदार निढाळकर यांचे सहकार्य लाभले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed