Pune Crime Court News | पुणे : बलात्कार अपहरण व पोस्को प्रकरणी आरोपीस पंधरा दिवसात जामीन मंजूर

Pune Crime Court News | Pune: Accused in rape, kidnapping and POSCO cases granted bail within fifteen days

पुणे : Pune Crime Court News | डेक्कन पोलीस ठाणे येथील २०२२ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी नामे कुणाल राजेश चांदणे या विशेष जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी आरोपीस बलात्कार व अल्पवयीन मुलीचे  अपहरण केल्याप्रकरणी पंधरा दिवसात जामीन मंजूर केला आहे सदर जामीन अर्ज ॲड. राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी न्यायालयात दाखल केला होता.

डेक्कन येथील एका कन्या शाळा मधून एक अल्पवयीन मुलगी शाळेच्या परिसरातून अज्ञात इसमाने कशाची तरी फुस लावून फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेल्याबद्दल सदर पीडित मुलीच्या वडिलांनी डेक्कन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता कुणाच्या अनुषंगाने मागील चार वर्षापासून पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा व डेक्कन पोलीस ठाणे यांच्यामार्फत समांतर तपास चालू होता चार वर्षानंतर विशेष गुन्हे शाखा यांनी सदर आरोपीस अटक करून डेक्कन पोलीस ठाणे येथे यांच्या हवाली केला असता डेक्कन पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून सदर आरोपीस विशेष न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीचा आदेश केला त्यानंतर ॲड. राकेश सोनार यांनी सदर आरोपीच्या वतीने विशेष न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश  यांच्यासमोर  ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीच्या वतीने व्यक्तिवाद करताना न्यायालयास निदर्शनास आणून दिले की सदर आरोपींवर केलेला आरोप हा खोटा असून प्रथम दर्शनी सदरचा कुठलाच प्रकार सिद्ध होत नाही व सदर पिढीचे आरोप यांनी अपहरण केलेला नाही तसेच सदर आरोपी हा पीडित मुली सोबत कोणताही अत्याचार केलेला नाही पोलिसांनी केलेला तपासातील कागदपत्राप्रमाणे सदर पीडित मुलीने वैद्यकीय तपासासाठी नकार दिला आहे व इतर पुरावा पाहता सदर आरोपी कुणाल राजेश चांदणे यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा प्रथमदर्शनी सिद्ध होत नसल्यामुळे सदर आरोपीस योग्य अटी व शर्ती वर जामीन मिळावा असे न्यायालयासमोर ॲड. राकेश सोनार यांनी युक्तिवाद केल्यानंतर सदर युक्तिवादाच्या अनुषंगाने मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सदर आरोपीस 25 हजार रुपयांचा जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना  ॲड. अविनाश खुडे ॲड . प्रियांका यादव, राज्यवर्धन राठोड यांनी सहकार्य केले.

You may have missed