Pune Crime Court News | पुणे : चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

court danduka

पुणे : Pune Crime Court News | सदर गुन्ह्यातील ३ आरोपी यमराज देवीसिंह कटुवाल, रमेश खटकाबहादूर खत्री, इंद्र धनसूर थापा यांनी यातील फिर्यादी उमेशकुमार राम यांच्यामध्ये झालेल्या वादावरून फिर्यादी याच्यावर चाकूने वार करून तसेच हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी नामे १) रमेश खटकाबहादूर खत्री २) इंद्र धनसूर थापा यांना अतिरिक्त जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. नाशिककर यांनी जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर ( Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली.

या गुन्ह्यातील आरोपी यांनी ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर ( Adv. Jitendra Janapurkar) यांच्या मार्फत जामीन अर्ज शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथील न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सदरील घटना ही १९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती. याबाबत चिखली पोलिस स्टेशन येथे स्वतः जखमी यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०९, ११५(२), ३५२, ३(५) म्हणजे जुना कायदा भा. द. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ . तसेच शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ४(२५). महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर माहिती अशी,
फिर्यादी नामे उमेशकुमार दिपपरमेश्वर राम हा राहणार दादा नेवाळे यांच्याकडे भाड्याच्या रूम नंबर 26 मध्ये, हरगुडे वस्ती, चिखली, पुणे. मूळ गाव नुआव, नेनुआण, बक्सार, नुआर्वे, राज्य बिहार. फिर्यादीच्या ओळखीचे इसम नामे 1) यामराज देवीसिंह कटुवाल हा हरगुडे वस्ती चिखली पुणे 2) रमेश खटकाबाहदुर खत्री हा कपीला चायनीज हॉटेल फुलेनगर चिंचवड पुर्ण 3) इंद्र धनसुर थापा हा हरगुडेवस्ती चिखली पुणे. येथे राहतात.

दिनांक 19/08/2024 रोजी रात्रौ 09/30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचे रूम पार्टनर प्रमोद कुमार, सुगंध कुमार व दीपक कुमार असे त्यांच्या रूमचा दरवाजा बंद करून आत मध्ये जेवण करत असताना कोणीतरी रूमच्या दरवाजावर हाताने जोरजोरात धक्के मारले तेव्हा फिर्यादी उमेशकुमार जेवण करताना उठून दरवाजा उघडून बाहेर येऊन पाहिले असता रूमच्या समोरील हरगुडे वस्ती कडून पवार वस्ती कडे जाणा-या रोडच्या कडेला असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूस चिखली पुणे. येथे 1) यामराज देवीसिंह कटूवाल 2) रमेश खटकाबाहदुर खत्री 3) इंद्र धनसुर थापा हे तिघेजन आपापसात वाद घालत होते त्यावेळी फिर्यादी त्यांना तुम्ही आमच्या रूमचा दरवाजा का वाजवला व तुम्ही येथे गोंधळ का घालता असे म्हणाले असता त्याचा राग येऊन त्या तिघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून यातील यामराज कटूवाल, रमेश खटकाबाहदुर खत्री व इंद्र धनसुर थापा यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली तेव्हा रमेश खटकाबाहदुर खत्री व इंद्र धनसुर थापा म्हणाले कि “यामराज हम इसको पकडते है तु इसको मार डाल.” असे बोलून त्या दोघांनी फिर्यादीला पकडले तेंव्हा यामराज देवीसिंह कटुवाल हा फिर्यादीला म्हणाला की, “तेरे को ज्यादा मस्ती आई क्या अभी तेरे को काट डालता है” असे म्हणून त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या मानेवर डाव्या बाजूने जोरात मारून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करून तेथून पळून गेले. त्यावेळी फिर्यादी जोरात ओरडला असता त्याच्या रूम मधील फिर्यादीचे रूम पार्टनर प्रमोद कुमार सुगंध कुमार दीपक कुमार हे पळत फिर्यादीजवळ आले त्यावेळी फिर्यादीच्या गळ्यातून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांनी फिर्यादीला प्रवासी रिक्षातून उपचार कमी वाय. सी. एम. हॉस्पिटल पिंपरी पुणे येथे आणून तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचार कामी रात्रौ 11:30 वाजता आयुष हॉस्पिटल नेहरूनगर पिंपरी पुणे येथे आणून अॅडमीट केले आहे फिर्यादीवर औषधोपचार करून डॉक्टरानी फिर्यादीच्या मानेची नस कट झाल्याचे सांगितले होते.
म्हणून फिर्यादी यांनी त्या तिघांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली.

या गुन्ह्यात जामीन मिळण्याकामी आरोपींनी ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सदर अर्जावर आरोपीतर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपी तर्फे बाजू मांडली. तसेच सरकारी वकील यांनी देखील आरोपीला जामीन मिळू नये म्हणून त्यांची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. सर्व परिस्थितीचा विचार केला करता, न्यायाधीश व्ही. व्ही. नाशिककर यांनी आरोपीना अटी व शर्तींवर जामिनावर सोडण्याचे आदेश केला.

या प्रकरणात ॲड. आनंदकुमार चव्हाण, ॲड. अफरोज जहागीरदार, ऋषिकेश पाटील, आशुतोष गडदे यांनी मदत केली.

You may have missed