Pune Crime Court News | पुणे: प्रेमा संबंधाबाबत प्रेयसीच्या घरी सांगितल्याच्या कारणावरुन मित्राचा खुन करणार्यास जन्मठेप ! सहा वर्षांनी लागला निकाल

पुणे : Pune Crime Court News | प्रेम संबंधाबाबत प्रेयसीच्या घरी सांगितल्याच्या कारणावरुन मित्राचा खुन करणार्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence In Murder Case) सुनावली. सुशांत रमेश ओंबळे Sushant Ramesh Omble (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड मुळ रा. विठ्ठलवाडी, पौड, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १० जुलै २०१८ रोजी घडली होती.
सुशांत ओंबाळे व अक्षय जोशी हे मित्र होते. घटनेच्या दोन वर्षापूर्वी सुशांत ओंबाळे व त्याची प्रेयसी यांचे प्रेम प्रकरण अक्षय जोशी याने प्रेयसीच्या घरी सांगितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. हा राग सुशांत ओंबाळे याच्या डोक्यात होता. त्याने मित्रांशी संगनमत करुन अक्षय जोरी याला कोथरुडमधील लोहिया आय टी पार्कच्या (Lohiya IT Park Kothrud) मागेील कलाग्राम सोसायटी येथे बोलावले. दारु पिल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुशांत याने बिअरची बाटली फोडून ती अक्षयच्या गळ्याजवळ खुपसून त्याचा खुन केला होता.
या गुन्ह्यात पोलिसांनी सुशांत रमेश ओंबाळे, प्रशांत रमेश ओंबाळे (वय २५), महेश ऊर्फ सागर मुकुंद मेस्त्री (वय २९, रा. गुजरात कॉलनी, भेलके चाळ, कोथरुड) यांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे (Appasaheb Shewale) यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए़. एन. मरे (Judge A. N. Mare) यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भागवत, मुळे व कोर्ट महिला अंमलदार जगदाळे यांनी गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार व इतर आवश्यक पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने सुशांत ओंबाळे याला आजन्म सश्रम कारावास (जन्मठेप) व ३० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब शेवाळे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळे (PSI Bhagwat Mule) व कोर्ट महिला अंमलदार जगदाळे यांनी ही कामगिरी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार