Pune Crime Court News | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Pune Crime Court

पुणे : Pune Crime Court News | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करणार्‍या प्रकरणातील एकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निर्णय दिला.

माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. कोणत्याही व्यक्तीचे आर्थिक नुकसान शारीरिक दुखापतीपेक्षा मोठे आहे. आर्थिक नुकसान संपूर्ण कुटुंबाला मानसिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या देखील त्रास देते. अशा परिस्थितीत अर्जदाराला या टप्प्यावर जामिनावर सोडले पाहिजे असे वाटत नाही, असे नमूद करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी जामीन फेटाळला आहे.

फसवणुकीच्या या प्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे.

आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फियार्दी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

माजीद उस्मान अत्तार याच्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी पी चौधरी यांच्या न्यायालयात झाली. अ‍ॅड. अमेय सिरसिकर, अ‍ॅड. महेश झंवर यांनी जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. आरोपीने इतरांशी संगनमत करुन अनेकांची फसवणूक केली आहे. सर्व आरोपींचा बांधकाम व्यवसाय हा एकत्रित व्यवसाय आहे. अनेक गुंतवणुकदारांनी या जामीन अर्जाला विरोध केला आहे. अतिरिक्त सरकारी वकिल गेहलोत यांनी एमपीआयडी अ‍ॅक्ट या प्रकरणात लागू होत असल्याचे सांगितले. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरु असून काही जणांना अजून अटक करायची असल्याचे सांगितले.

या प्रकरणातील सर्व आरोपी हे एकमेकासोबत काम करत होते. यातील सर्व आरोपींविरोधात सारखाच पुरावा आहे.
त्यामुळे या प्रकरणात एमपीआयडी अ‍ॅक्टमधील कलम ३ लागू होते. या टप्प्यावर आरोपीविरोधात पुरेसा पुरावा आहे.
तपास अजून सुरु असून आणखी काही जणांना अटक व्हायची आहे. संगनमताने हा गुन्हा केला आहे.
या परिस्थितीत आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो,
असे नमूद करीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी जामीन फेटाळला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed