Pune Crime News | मोटारसायकली चोरणारी टोळी देहुरोड पोलिसांनी केली जेरबंद; 6 गुन्हे आणले उघडकीस, 5 मोटारसायकली, 1 रिक्षा जप्त

Dehuraod Police

पुणे : Pune Crime News |  विनानंबर प्लेटची मोटारसायकल चालविणार्‍याला पकडल्यावर त्याने व दोन साथीदारांनी मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. देहुरोड पोलिसांनी त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणून ५ मोटारसायकली व एक रिक्षा जप्त केली आहे.

ईश्वर संदीप गजे (वय २२, रा. खालुंब्रे, ता. खेड, मुळ रा. शिवाजीनगर बस स्टँड मागे, अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत ऊर्फ संतोष विटकर (वय २०, रा. देहुगाव) आणि आर्यन ऊर्फ एस पी आनंदा राऊत (वय १९, रा. भारतमाता चौक, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत विटकर याच्या विरुद्ध देहुरोड पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून २०२५ मध्ये दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आर्यन राऊत विरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल आहे.

देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक २७ जानेवारी रोजी देहुगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक जण परंडवाल चौकाकडून पेट्रोल पंपाकडे विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वर्णनावरुन ईश्वर गजे याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकल देहुरोडमधून चोरीला गेलेली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अनिकेत विटकर व आर्यन राऊत यांच्याबरोबरीने वाहनचोरी करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ मोटारसायकली व एक रिक्षा जप्त केली. खडक व सिंहगड पोलीस ठाण्याचे प्रत्येकी एक आणि दिघी व देहुरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन असे ६ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची ६ मोटारसायकल व १ रिक्षा जप्त केली आहे. एका मोटारसायकलीचा तपास सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, पोलीस अंमलदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते, सुरेश ढवळे, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, युवराज माने, शुभम बावनकर, अमोल माने, मोमीन शेख यांनी केली आहे.

You may have missed