Pune Crime News | मोबाईल चोरुन PhonePe वरुन घेतले दीड लाख रुपये काढून

crime-logo

पुणे : Pune Crime News| पासवर्ड कोणाला समजणार नाही असा ठेवा, तो कोठे लिहून ठेवू नका, असे सांगितले जाते. चोरट्याने मोबाईल चोरुन नेल्यानंतर त्याला पासवर्ड मिळाल्याने त्याने PhonePe व G-Pay वरुन तब्बल दीड लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अशरफ कुरबान अन्सारी (वय २१, रा. सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशनच्या (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाहेर तिकीट खिडकीजवळ ११ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना जबलपूरला जायचे असल्याने ते पुणे रेल्वे स्टेशनला १० जुलै रोजी आले होते. परंतु, जबलपूरला जाणारी रेल्वे निघून गेल्याने दुसर्‍या दिवशीच्या गोदावारी एक्सप्रेसने जाण्याचे त्यांनी ठरविले. स्टेशनच्या तिकीट काऊंटरच्या बाहेर असणार्‍या कटट्यावर ते बसले होते. त्यावेळी एक जण त्यांच्याशी बोलू लागला. त्याने मलाही जबलपूरला जायचे असल्याचे सांगितले. फिर्यादीबरोबर तो तिकीट काऊंटरच्या बिल्डिंगमध्ये झोपला होता.

त्या दरम्यान त्याने फिर्यादीकडे दोन तीनदा मोबाईल मागितला. त्यावर काहीतरी चेक करुन परत दिला होता. फिर्यादीच्या मोबाईलवरुन त्याने २२ रुपयांचा रिचार्जही केला होता. दुसर्‍या दिवशी दुपारी तिकिट खिडकीच्या एका बाजूला फिर्यादी तर बॅरिकेटच्या दुसर्‍या बाजूला तो होता. तेव्हा त्याने गाडीचा वेळ पाहण्यासाठी मोबाईल मागितला. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्याने जबरदस्तीने मोबाईल हिसकावून तो पळून गेला.

दुसर्‍या दिवशी त्यांनी नवीन सीमकार्ड घेऊन दुसर्‍या मोबाईलमध्ये टाकल.
तेव्हा त्यांच्या मोबाईलमधून गुगल पेद्वारे १२ हजार रुपये तर फोन पेद्वारे क्रेडिट कार्डवरुन
१ लाख १९ हजार रुपये ऑनलाईन काढल्याचे आढळून आले.
गावाहून आल्यानंतर आता त्यांनी चोरट्याने १ लाख ५१ हजार रुपये चोरुन नेल्याची फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गुप्ता (PSI Dheeraj Gupta) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

You may have missed