Pune Crime News | बुधवार पेठेतून 10 बांगला देशी महिलांना अटक; बनावट आधार कार्डच्या आधारे रहात होत्या कुंटणखान्यात
पुणे : Pune Crime News | पुण्यातील वादग्रस्त बुधवार पेठेत खडक पोलीस आणि फरासखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० बांगला देशी महिला आढळून आल्या आहेत. बनावट आधार कार्डच्या आधारे या महिला भारतात रहात होत्या. या महिलांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यातच पुणे पोलिसांनी आजवरचा सर्वात मोठा बंदोबस्त लावत बुधवार पेठेत छापेमारी केली होती. त्यात २ बांगला देशी महिला तसेच ४ अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले होते.
बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर खडक व फरासखाना पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. त्यात संशयास्पद असलेल्या २२ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील कागदपत्रे तपासण्यात आली. त्यातील ११ महिला या बांगला देशी असल्याचा संशय आहे. त्यातील १० महिला या बांगला देशी असल्याचे आढळून आले. त्यांनी बनावट आधार कार्ड बनवुन घेऊन पुण्यात रहात असल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, खडक व फरासखाना पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यातील १० महिला या बांगला देशी असल्याचे उघडकीस आल्याचे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.
