Pune Crime News | शिक्षकांच्या पगारातून कापून घेतली जात होती 10 टक्के रक्कम; स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थाचालकांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शासकीय अनुदानासाठी फाईल शिक्षण विभागाकडे पाठवायची असेल तर ५ हजार रुपये घेऊन पुढे निवृत्त होईपर्यंत दरमहा पगाराच्या १० टक्के रक्कम संस्थेस द्यावी लागेल अशी मागणी करुन गेल्या वर्षभरापासून शिक्षकांकडून दरमहा २५ हजार रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ३५ वर्षाच्या शिक्षकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था (Late Ambarchandji Munot Shikshan Sanstha in Katraj), अशोकलाल अंबदचंद मुनोत (Ashoklal Ambarchand Munot), निखिल अशोकलाल मुनोत (Nikhil Ashoklal Munot), उल्का शशिकांत नवगिरे (Ulka Shashikant Navgire), सुरेखा महादेव सुतार (Surekha Mahadev Sutar), हर्षदा अशोकलाल मुनोत (Harshda Ashoklal Munot) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मार्च २०२३ पासून आतापर्यंत सुरु आहे. त्यातील अशोकलाल मुनोत, निखिल मुनोत आणि सुरेखा सुतार यांच्यावर यापूर्वी यावर्षी अॅट्रोसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आरोपींनी बोलावून शासकीय अनुदानाची फाईल शिक्षण विभागाकडे पाठवायची असेल तर प्रत्येकी ५ हजार रुपये द्यावे लागतील व त्यानंतर निवृत्त होईपर्यंत दरमहा पगाराच्या १० टक्के रक्कम ही संस्थेस द्यावी लागेल, अशी मागणी केली. फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये रोख स्वरुपात व ऑनलाईन पद्धतीने असे एकूण दरमहा २५ हजार रुपये स्वीकारले. तसेच दरमहा पगाराच्या १० टक्के रक्कमेची वेळोवेळी मागणी करुन ती शिक्षकांनी देण्यास नकार दिल्याने त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊन सर्वाचा आर्थिक व मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?