Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून तब्बल 10 धारदार पालघन, 2 लोखंडी तलवारी जप्त

Pune Crime News | 10 sharp knives, 2 iron swords seized from innkeeper

पुणे : Pune Crime News | खडक पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाण्यात पिस्तुल बाळगल्याचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या जनता वसाहतीतील घरातून (पर्वती) १० धारदार पालघन व २ लोखंडी तलवारी जप्त केल्या आहेत.

शैलेश विजय कसबे Shailesh Vijay Kasbe (रा. जनता वसाहत, पर्वती) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ मार्च २०२६ रोजी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस अंमलदार महेश मंडलिक व राकेश सुर्वे यांना गोपनीय बातमी मिळाली. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व बसवराज माळी व पोलीस अंमलदार यांनी शैलेश कसबे याला पकडून त्याच्या रहत्या घरातून १० धारदार पालघन व २ लोखंडी तलवार असा १४ हजार ४०० रुपयांचा शस्त्र साठा जप्त करण्यात आला. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले, की शैलेश कसबे हा मुळचा खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. त्याला दोन पत्नी असून त्याची दुसरी पत्नी जनता वसाहतमध्ये राहते. तिच्या घरातूनच हा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. शैलेश कसबे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खडक पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, बसवराज माळी, पोलीस हवालदार प्रकाश मरगजे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, चिव्हे,राकेश सुर्वे, दबडे, बनसोड यांनी केली आहे.

You may have missed