Pune Crime News | दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? आदल्या दिवशी सायंकाळी टेलिग्राम ग्रपवर संपूर्ण पेपरच केला होता अपलोड, सायन्सचे पेपर खरेदी करण्याचा मेसेज

Pune Crime News | 10th class math question paper leaked? The entire paper was uploaded on the Telegram group the previous evening, message to buy science paper

पुणे : Pune Crime News | दहावीचा गणित भाग -१ आणि गणित भाग -२ या दोन विषयांची प्रश्न पत्रिका फुटल्याचे उघडकीस आले आहे. गणित भाग -१ चा पेपर आदल्या दिवशी तर गणित भाग -२ चा ९ मार्च रोजी होणारा पेपर ६ मार्च रोजीच टेलिग्राम ग्रुप फोडण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून हे पेपर खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे बोर्डाचे नेमके किती पेपर फुटले याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहायक अधीक्षक चंद्रकांत जेवळीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी टेलिग्राम चॅनेलवर ग्रुपधारक अ‍ॅडमीन, ग्रुपमधील सदस्य व या गैरप्रकारात सामील असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांच्याकडून विभागीय मंडळाचे सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांना १०वीचे बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटीबाबत माहिती दिली. तसेच व्हॉटसअ‍ॅपवर तक्रार पत्र देण्यात आली. तसेच तक्रारीसंदर्भात लिंकही देण्यात आली. मीनाक्षी राऊत यांनी मोबाईलवर टेलिग्राम अ‍ॅपवर ओपन केली व तपासणी केली. त्यावर महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स असा ग्रुप तयार केला आहे. तो ग्रुप ओपन करुन पाहिला असता या ग्रुपवर गणित १ या विषयाचे दिनांक ६ मार्च २०२६ रोजीचे व गणित २ चे ९ मार्च रोजीचे संपूर्ण राज्याचे पेपर बोर्डाचे वेळापत्रकानुसार असलेले पेपर्स या टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आले आहेत.

गणित १ चा पेपर ५ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी टाकण्यात आला. (जो ६ मार्च रोजी होता) गणित २ चा पेपर ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी टाकण्यात आलेला दिसला. (जो पेपर ९ मार्च रोजी होता), ग्रुपवरील पेपर व महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे पेपर्स तपासणी केले असता टेलिग्रामवरील पेपर हे एकच असल्याचे आढळून आले आहे. तसेच या ग्रुपवर ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी सायन्स १ आणि सायन्स २ उपलब्ध होतील असा  https://t.me/maharashtraleakers मेसेज इंग्रजीमध्ये टाकण्यात आला आहे. तसेच या टेलिग्राम ग्रुपवर हे पेपर खरेदी करावे असा मेसेज टाकण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर तपास करीत आहेत.

You may have missed