Pune Crime News | पतंग उडविताना तोल जाऊन पडल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा

Pune Crime News | 12-year-old boy dies after losing balance while flying kite; Case filed against construction workers for being responsible for the accident

पुणे : Pune Crime News | पतंग उडविण्यासाठी गेलेला १२ वर्षाचा  मुलगा बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतील जिन्यास कठडे नव्हते. जिन्याच्या बाजुला असलेल्या डक्टच्या बाजूला कोणताही प्रकारचा संरक्षित कठडा नव्हता. संरक्षित जाळी बसविण्यात आली नाही. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

श्लोक नितीन बांदल (वय १२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज ) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय ३५, रा. ओैंदुबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर, महेश धूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरातील स्नेहस्पर्श  गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या गृहप्रकल्पाच्या शेजारील सोसायटीत बांदल कुटुंबीय राहायला आहेत. श्लोक पाचवीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कामाला आहे.  गुरुवारी (८ जानेवारी) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक व त्याचे दोन मित्र बांधकाम सुुरू असलेल्या इमारतीत पतंग उडविण्यासाठी गेला. सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने श्लोक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या इमारतीचे काम सुरू होते. तेथे वॉचमन ठेवण्यात आला नव्हता. बांधकाम सुरु असताना बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट रहायला दिले होते. सहाव्या मजल्यावरील जिन्याचे बाजूला असलेल्या डक्टचे बाजूला कोणताही प्रकारचा संरक्षित कठडा नाही़ तसेच जिन्याच्या बाजूच्या डक्टचे बाजूला कोणत्याही प्रकारचे बॅरेकेटिंग केल्याचे आढळून आले नाही. सुरक्षेसंबंधी कोणतीही काळजी न घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिं दोडमिसे तपास करीत आहेत.

You may have missed