Pune Crime News | 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; सावत्र आईच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | एकाच घरात रहात असताना अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले.

याबाबत एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीच्या सावत्र आईच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२५ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही १५ वर्षे व ११ महिन्यांची आहे. तिच्या सावत्र आईचा एक अल्पवयीन मुलगा आहे. त्याने फिर्यादीशी मैत्री करुन तिच्यासोबत वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ती आता ३२ आठवड्याची गर्भवती आहे. ही बाब आता लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी तपास करीत आहेत.

You may have missed