Pune Crime News | रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने 17 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर (Sanitary Inspector In Railway) म्हणून नोकरीचे (Lure Of Job) नियुक्तीपत्र देण्याचा बहाणा करुन एकाने पुण्यातील १७ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत पिंपरी येथील ३५ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेश दिनकर राजगुरु Rajesh Dinkar Rajguru (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२१ पाासून आतापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) येथे घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना राजेश राजगुरु याने रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदावर नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे १० लाख रुपये घेतले. फिर्यादी यांच्या ई मेलवर रेल्वेत नियुक्ती मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले व ते खरे असल्याचे भासविले. त्यांना या नियुक्तीपत्रात नाशिक येथे नियुक्ती केल्याचे दाखविले होते. त्यानुसार ते नाशिकला गेले. तेव्हा त्यांची अशी कोणतीही नियुक्ती करण्यात आली नसून ते पत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. अशा प्रकारे अजून १७ जणांची राजेश राजगुरु याने पैसे घेऊन किमान ५० लाख ६० लाख रुपयांची फसवणुक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण (PSI Ganesh Chavan) हे तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी