Pune Crime News | जबरी चोर्‍या करणार्‍या सराईत चोरट्याच्या घरझडतीत सोनसाखळीबरोबर सापडले 2 पिस्टल, 4 काडतुसे

Vishrambaug Police

पुणे : Pune Crime News | वृद्ध महिलेल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडले (Arrest In Robbery Case). त्याच्याकडील सोन साखळी शोधण्यासाठी पोलिसांनी घरझडती घेतली. त्यात पोलिसांना सोनसाखळी बरोबरच २ पिस्टल व ४ काडतुसे आढळून आली. (Pistol Seized)

रफिक सलीम खान (वय ३६, रा. जिवलग सोसायटी, आयटीए स्किम, निगडी) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. शास्त्री रोडवरुन जाणार्‍या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोनसाखळी मोटारसायकलस्वाराने हिसकावून नेली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील (Vishrambaug Police Station) तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन कदम यांना त्यांच्या बातमीदाराने सांगितले की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक खान याने हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यास आरोपीच्या पत्तावर पोलीस गेले. त्याच्या घरझडतीत २० ग्रॅम सोन्याच्या चैनसह २ देशी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे मिळून आली. रफिक खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल,
सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार सचिन कदम, मयुर भोसले, अशोक माने, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, जाकीर मणियार, कैलास डुकरे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, नितीन बाबर, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)