Pune Crime News | पुण्याहून हैदराबाद येथे विमानाने जाणार्या प्रवाशाच्या बॅगेत सापडली 28 जिवंत काडतुसे
पुणे : Pune Crime News | पुण्याहून हैदराबाद येथे विमानाने जाणार्या प्रवाशाच्या बँगेत दोन मॅगझीनसह २८ जिवंत काडतुसे सापडली असून पिस्तुल सापडले नाही तर फक्त काडतुसे सापडली. आपल्या बँगेत कोणीतरी ही जिवंत काडतुसे टाकल्याचे या शेतकरी नेत्याने दावा केला आहे. (Cartridges Seized)
याबाबत इंडिगो एअरलाईन्सच्या सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दीपक सिताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर) याला अटक केली आहे. ही घटना ३ जानेवारी रोजी रात्री पावणे अकर वाजता विमानतळावर घडली. दीपक काटे हे एअरपोर्टवर आले. त्यांची काळ्या रंगाची चेक इन बॅक (डफलबॅग) ही तपासणी मशीनवर चेक केली असता त्यात संशयास्पद मेटल डिटेक्ट झाले. फिर्यादी व त्यांचे सहकारी साहिल शेख यांनी बॅग उघडून ती तपासली असता बॅगेमध्ये कॅरीबॅगचे पिशवीमध्ये ७.६५ कॅलीबरचे २८ जिवंत काडतुसे व दोन मॅगझीन आढळले. दीपक काटे यांच्याकडे याबाबत विचारणा करता त्यांनी ही बॅग आपली असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे सांगितले. या काडतुसाबाबत त्यांनी काहीही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन दीपक काटे यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे (PSI Sandeep Karpe) यांनी सांगितले की, दीपक काटे हे इंदापूर येथील शेतकरी असून शेती व दुग्धव्यवसायाबाबतची आंदोलने करतात. गेली काही दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमात फिरत होतो. हैदराबाद येथील वारकरी कार्यक्रमासाठी दरवर्षी जातो. त्याप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला जात होतो. हे सर्वांना माहिती होते. एकटाच कारमधून कार्यक्रमाला जात असतो. आपल्याला राजकारणात पुढील काळात संधी असल्याने त्यादरम्यान कोणीतरी अडकविण्यासाठी हे जिवंत काडतुसे बँग टाकली असावी, असा दीपक काटे यांनी दावा केला आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असल्याने काटे यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात