Pune Crime News | शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफा देण्याचे आमिष दाखवून तिघांना 32 लाखांना गंडा

Share Market

पुणे : Pune Crime News | शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असल्याचे सांगून शेअर (Lure Of Profit In Share Market) ट्रेडिंगमध्ये जादा नफा देण्याचे आमिष दाखवून तिघा जणांची ३२ लाख २६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case).

याबाबत एका ३४ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १६ एप्रिल ते २७ जुलै २०२४ दरम्यान घडली. फिर्यादी यांना आरोपींनी शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील ११ लाख ७५ हजार रुपये शेअर्स बाजारात गुंतविण्यासाठी दिले. त्यानंतर जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल. तेव्हा त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरु केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक घोडके तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत ६४ वर्षाच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांना अनोळखी आरोपींनी शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानुसार त्यांना १६ लाख ३१ हजार रुपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केली. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. (Pune Crime News)

लोहगाव (Lohegaon) येथील एका ४० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी डॉ. धनंजय सिन्हा, सिफाली बग्गा तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १ जानेवारी ते २फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला. फिर्यादी यांना आरोपींनी वेल प्रो अ‍ॅप डाऊनलोड करावयास लावले.
त्याद्वारे वेगवेगळ्या शेअर्स व आयपीओ मध्ये गुंतवणुक केल्यावर २० टक्के या प्रमाणात चांगला मोबदला मिळवून देण्याचे खोटे अमिष दाखविले.
त्यांचा एका ग्रुपमध्ये समावेश केला. या ग्रुपमधील लोक चांगला मोबदला कमावत असल्याचे स्किन शॉटस शेअस केले गेले.
त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना विविध बँक खात्यावर एकूण ३ लाख २० हजार रुपये भरावयास भाग पाडून त्यांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक कुंभार तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी