Pune Crime News | शहरातील 49 एटीएमची छेडछाड करुन तब्बल 1 कोटी 28 लाखांची लुट ! तब्बल पाच वर्षानंतर तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल

ATM

पुणे : Pune Crime News | एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) पैसे काढण्यास जाऊन तेथील पॉवर सप्लाय बंद करुन बँकांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रकार एक राजस्थानी टोळीकडून केला जात होता. अशा प्रकारे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ४९ एटीएम सेंटरमधून या टोळीने १ कोटी २८ लाख ७६ हजार ५२० रुपयांची लुट केली. एटीएम सेंटर उभारणार्‍या कंपनीने तक्रार अर्ज केला होता. तो गुन्हा कोणी दाखल करायचा यावर पुणे (Pune Police), पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police) परस्परांवर टोलवाटोलवी झाल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DAdEUt8Cl2u

याबाबत टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन कंपनीतर्फे अमित चव्हाण (वय ५०, रा. ठाणे) यांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station PUne) ऑनलाईन फिर्याद दिली आहे. हा प्रकार शहरातील ४९ एटीएममध्ये १४ डिसेंबर २०१७ ते १६ एप्रिल २०१९ दरम्यान घडला होता.

https://www.instagram.com/p/DAdCmUGidyh

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन लि. या कंपनीतर्फे स्टेट बँकेचे एटीएम सेंटर बसविण्यात आले आहे. एका टोळीने पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढायला जाऊन पैसे येण्याच्या अगोदरच मशीनचा पावर सप्लाय बंद करत़ आलेली कॅश ओढून काढत. पावर बंद झाल्याने तिकडे व्यवहार अर्धवट झाल्याची नोंद होत असे. अशा प्रकारे या टोळीने शहरातील ४९ एटीएम सेंटरमधून पैसे काढून तब्बल १ कोटी २८ लाख ७६ हजार ५२० रुपयांची फसवणूक केली.

https://www.instagram.com/p/DAdA8R0JBmn

हे सर्व स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये घडले. याबाबत स्टेट बँकेच्या वतीने तक्रार देणे आवश्यक होते. परंतु, हे एटीएम टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन कंपनीने उभारले असल्याने बँकेने त्यांच्या पेमेंटमधून हे पैसे कपात करुन घेतले. त्यामुळे कंपनीच्या वतीने सायबर पोलिसांकडे पाच वर्षापूर्वी एक तक्रार अर्ज करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी (Cyber Crime) पिंपरी चिंचवडला हा प्रकार घडला म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हा अर्ज पाठविला. त्यांनी तो पुन्हा पुणे पोलीस आयुक्तालयाकडे पाठविला. कंपनी केवळ ऑनलाईन तक्रार करत होती. पिंपरी, पुणे करण्यात तीन तपास अधिकारी बदलले गेले. शेवटी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले (Rameshwar Rewale) यांच्याकडे हा तक्रार अर्ज आला. त्यांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAc_fGyC2vR

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)