Pune Crime News | पैशांसाठी 70 वर्षाच्या वडिलांना काठीने बेदम मारहाण करुन केले जखमी

crime seen

पुणे : Pune Crime News | शेळीपालन व्यवसाय करणार्‍या ७० वर्षाच्या वडिलांनी अगोदरच २ लाख रुपये दिले असतानाही आणखी पैसे मागून मुलाने वेळूच्या काठीने मारहाण करुन वडिलांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत श्रीधर मनोहर आंबेकर (वय ७०, रा. इंदिरा कॉलनी, कोरेगाव मूळ ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलगा गणेश श्रीधर आंबेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीधर आंबेकर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. ते, पत्नी, मुलगा, सुन, नातू असे एकत्र राहतात. त्यांनी मुलगा गणेश याला अगोदर २ लाख रुपये दिले होते. ते घरी असताना २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता त्यांचा मुलगा गणेश आंबेकर यांनी जागा घेण्यासाठी व घराचे प्लॅस्टर करण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा ते म्हणाले की, या अगोदर २ लाख रुपये दिले आहेत. माझ्याकडे आता पैसे नाहीत. तू मला पैसे मागू नको, असे सांगितले. त्यानंतर गणेश आंबेकर याने त्याचे आधार कार्ड व बँकेची दोन पुस्तके व पोस्टाचे पुस्तक त्यांच्याकडून घेतले. त्यांना दमदाटी करु लागला म्हणून ते समजावून सांगत असताना त्याने जवळच पडलेली शेळ्या राखण्याची वेळूच्या काठीने त्यांच्या उजव्या हाताचे खांद्याजवळ, डावे व उजवे पायावर, डावे हातावर, पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली आहे. त्यानंतर त्यांची पत्नी संगिता ही भांडणे सोडविण्यास मध्ये पडल्यावर तिला ही शिवीगाळ दमदाटी केली. फिर्यादी यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार होळकर तपास करीत आहेत.