Pune Crime News | MBBS कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याचे आमिष दाखवून 8 लाखांना घातला गंडा

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  तळेगाव दाभाडे येथील एमबीबीएस कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देतो, असे भासवून दोघांनी पालकांची ८ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत हडपसर येथील मंतरवाडी येथे राहणार्‍या एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य कुमार (अरविंद आरोगोंड), कुसुम व्यंकटा राव (के व्ही राव) (दोघे रा. हैद्राबाद, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील माणिकचंद स्कायलॉन येथील कार्यालयात ५ नोव्हेंबर २०२५ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कल्याणीनगर येथील माणिकचंद स्कायलॉन येथे कार्यालय स्थापन करुन सोशल मीडियावर जाहिरात केली. फिर्यादी यांनी संपर्क साधल्यावर त्यांना एमबीबीएस कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवुन देतो, असे भासवले. कंपनीच्या कर्मचारी मार्फत वेळोवेळी रक्कम घेतली. त्याबाबतचा करारनामा केला़. तळेगाव दाभाडे येथील मेडिकल कॉलेजचे खोटे व बनावट प्रवेश पत्र देऊन फिर्यादी यांची दिशाभूल केली. त्यांच्याकडून ८ लाख १२ हजार रुपये घेतले. काही दिवसांनी कार्यालय बंद करुन दोघे पसार झाले आहेत. फिर्यादी यांनी कॉलेजमध्ये प्रवेश पत्र दाखविल्यावर ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी राव याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यालय बंद असल्याचे आढळले. त्यांच्याबरोबरच अनेक पालकांचा विश्वासघात करुन अ‍ॅडमिशन न करता फसवणूक केल्याचे  दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक बेरड तपास करीत आहेत.

You may have missed