Pune Crime News | महिलेला वेश्या व्यवसायाला लावून तिच्या कमाईतील 30 ते 35 लाख रुपये घेऊन तिला मारहाण करणार्या कुंटणखाना चालक पापा शेखवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | गेल्या ४ वर्षापासून बंगाली महिलेला वेश्या व्यवसायाला लावून तिच्या कमाईतील ३० ते ३५ लाख रुपये घेऊन तिला मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या कुंटणखाना चालक पापा शेख (Papa Shaikh) याच्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पापा शेख ऊर्फ बाबु भैय्या (वय ४५, रा. नवीन बिल्डिंग, बुधवार पेठ – Budhwar Peth), त्याची पत्नी रुपा (वय ४०) आणि मॅनेजर संजू (वय ३८, रा. नविन बिल्डिंग, बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पापा शेख ऊर्फ बाबु भैय्या हा बुधवार पेठेतील नविन बिल्डिंगमध्ये कुंटणखाना चालविण्याबरोबरच तेथून जवळच असलेल्या शेट्या मारुती मंदिराजवळही एक कुंटणखाना चालवत असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.
याबाबत मुळ पश्चिम बंगालमध्ये राहणार्या एका २८ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. पापा शेख हा सातत्याने मारहाण करीत असल्याने व खर्चाला पैसे देत नसल्याने ही महिला त्याच्या तावडीतून निसटून बहिणीकडे गेली. त्यानंतर दोन्हींनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिच्या ओळखीच्या एका मुलीने सुमारे ४ वर्षापूर्वी पुण्यात घरकाम मिळवून देण्याच्या आमिषाने फिर्यादी हिला पुण्यात आणून पापा शेख याला विकले. फिर्यादी यांना त्यावेळी केवळ बंगाली भाषा देत होती. बंगाली भाषा बोलणार्या मुलीकडून येथे वेश्या व्यवसाय केला जातो, याची माहिती मिळाली. नाईलाजाने पापा शेख सांगेल त्याप्रमाणे तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करावा लागला.
पापा शेख तिला दर महिना १० ते १५ हजार रुपये देऊ लागला. तिने केलेल्या प्रत्येक कामाचे अर्धे तिला व अर्ध पापा शेख याने घ्यायचे हे ठरले होते. ती दरमहिन्याला अंदाजे दोन ते अडीच लाखांचे काम करत होती. तरीही पापा शेख याने तिला कधीच पुणेपणे पैसे व हिशोब दिला नाही. तिने त्याला वेळोवेळी पैश्यांची मागणी केली. परंतु तो तिला पैसे न देता सतत जीवे मारण्याची धमक्या देत होता.
२७ ऑक्टोबर रोजी तिने रुमवर काम करणार्या मावशीच्या फोनवरुन पापा शेख याची पत्नी रुपा हिला फोन करुन मला आता पैश्यांची गरज असल्याचे सांगितले. तेव्हा तिने पैसे नंतर देते, असे सांगितले. त्यानंतर पापा शेख, त्याची पत्नी रुपा व मॅनेजर संजू हे तिच्या रुमवर आले. त्यांनी तिला सारखे पैसे का मागते या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने फिर्यादी या घाबरुन गेल्या.
सतत होणारी शिवीगाळ, मारहाणीला वैतागून तिने तेथून पळून जाण्याचा निश्चय केला. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ती कोणाला काही न सांगता तेथून पळून आपल्या बहिणीकडे आंबेगावला गेली. तिने धीर दिल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांची भेट घेतली. त्यांची हकिकत ऐकल्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !