Pune Crime News | फर्ग्युसन रोडवर बांगलादेशींच्या कपड्यांच्या स्टॉलवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Videos)
पुणे : Pune Crime News | फर्ग्युसन रोडवर (FC Road Pune) बांगलादेशींकडून लावल्या जाणाऱ्या कपड्यांच्या स्टॉलवर कायदेशीर कारवाई करा, या मागणी साठी शनिवारी रात्री उशिरा आंदोलन करणार्या हिंदू सकल समाजाच्या (Sakal Hindu Samaj) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस नाईक अनुराधा मुळीक यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उज्वला जितेंद्र गौड (Ujwala Jitendra Gaud), शरयु परब, हेमंत दत्ता गायकवाड (Hemant Datta Gaikwad), मुन्ना विठ्ठल गवळी (Munna Vitthal Gavali) व इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फर्ग्युसन रोडवरील वाडेश्वर हॉटेलसमोर (Wadeshwar Hotel FC Road) शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाडेश्वर हॉटेल ते रुपाली हॉटेल (Rupali Hotel FC Road) दरम्यान असलेल्या गल्लीमध्ये कपड्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बांगलादेशींकडून (Bangladeshi Nationals) हे कपड्याचे स्टॉल उभारले गेले असून त्यांच्यात नेहमी वादावादी, भांडणे होत असतात. हिंदू तरुणींना आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात असल्याचे म्हटले जाते.
याविरोधात यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. हिंदू सकल समाजातील कार्यकर्ते शनिवारी रात्री उशिरा येथे एकत्र आले.
त्यांनी या बांगलादेशींच्या कपड्याच्या स्टॉलवर कारवाई करावी, अशी मागणी करुन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
त्यामुळे फर्ग्युसन रोडवरील वाहतूक बंद होऊन मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत. (Sakal Hindu Samaj Protest On FC Road Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु