Pune Crime News | तडीपार असताना पुण्यात येऊन शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने केली अटक

New Project (10)

पुणे : Pune Crime News | वाघोली परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड करून दहशत पसरणाऱ्या गुन्हेगाराला तडीपार केले असताना पुन्हा पुण्यात येऊन शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे.

आदित्य दीपक कांबळे Aditya Deepak Kamble ( वय १९, रा. सिद्धिविनायक पार्क, ओव्हळवाडी रोड, वाघोली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
कोयत्याचा धाक दाखवून आणि तोडफोड करून वाघोली भागात दहशत माजवणाऱ्या चौघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी मार्च २०२५ मध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पोलीस अंमलदार हे ४ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन घाडगे यांना तडीपार गुंड आदित्य कांबळे हा धारदार शस्त्र घेऊन रायसोनी कॉलेज लगतच्या मैदानात थांबला असल्याची बातमी मिळाली. पोलिस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा पोलिसांना पाहून तो काहीतरी लपवू पहात होता. पोलिसांनी त्याला हत्यारासह ताब्यात घेतले. वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सासारंग दळे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, गिरीश नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, नेहा तापकीर, नितीन घाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदले, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

You may have missed