Pune Crime News | पुण्यासह ठाणे, संभाजीनगर येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगाराला एमपीडीए खाली केले नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | पुणे, ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवुन घेणाºया गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. (Pune Police MPDA Action)
धनराज शामराव जाधव Dhanraj Shyamrao Jadhav (वय ४४, रा. शिवहाईटस, खारगर, नवी मुंबई) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
धनराज जाधव हा स्पा च्या नावाखाली अनैतिक व्यापार चालवत असल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. त्याच्याविरुद्ध ठाणे शहरातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये आणि पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी धनराज जाधव याच्यावर एमपीआयडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सादर केला होता. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन ७ फेब्रुवारी रोजी धनराज जाधव याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार वानवडी पोलिसांनी धनराज जाधव याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
