Pune Crime News | डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणाला कोयत्याने मारण्याची धमकी, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या बाहेरील घटना

Lonikand Pune Crime

पुणे : Lonikand Pune Crime News | पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोयत्याने दहशत माजवली जात असतानाच रस्त्यावर चिरडून मारण्याच्या घटना घडत आहेत. यातच डॉक्टरनेच कोयता हातात घेत तरुणाच्या घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच रस्त्यात तरुणाची गाडी अडवून त्याला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलीस स्टेशनच्या बाहेर कोयत्याचा धाक (Koyta Threat) दाखवून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.3) सायंकाळी पाच ते सहा दरम्यान वाघोली (Wagholi) परिसरात घडला आहे.

याबाबत प्रितेश प्रकाश बाफणा (वय-36 रा. आशिर्वाद बिल्डींग, बजाज शोरुम समोर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉ. विवेक गुप्ता (Dr Vivek Gupta), अजय सावंत, प्रशांत ढमडेरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115, 126(2), 324(2)(6), 352, 351(5), 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने आरोपी डॉ. गुप्ता व त्याच्या दोन साथीदारांनी तरुणाच्या घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ करुन दमदाटी केली.
त्यानंतर डिकॅथलॉन स्पोर्ट्स शोरूम समोर प्रितेश बाफणा याची गाडी अडवून गाडीवर दगड मारुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याबाबत प्रितेश लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता आरोपींनी
पोलीस स्टेशन बाहेर कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed