Pune Crime News | मद्यधुंद तरुणाने हॉटेलपासून ससुनपर्यंत घातला गोंधळ; पोलिसांसह डॉक्टरांची पकडली कॉलर

Drunken Youth

पुणे : Pune Crime News | मद्यधुंद तरुणाने गोंधळ घालून हॉटेल बंद करण्यास विरोध केला. पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवीगाळ केली. तेव्हा त्याला अटक करुन ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणीसाठी नेले तर तेथे त्याने डॉक्टरांची कॉलर पकडली.

मोहम्मद शौकत अली सय्यद (वय ३२, रा. यशरिदम बिल्डिंग, पारगेनगर, कोंढवा) असे या मद्यधुंद तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मार्शल म्हणून ८ सप्टेबर रोजी रात्री कर्तव्यावर होते. मध्यरात्री १ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास जीपीओ चौकासमोरील विक्रम हॉटेल येथील वेटर दौलत यांनी एका जण हॉटेलमध्ये दारु पिऊन गोंधळ करुन शिवीगाळ करत आहे.

हॉटेल बंद करण्याची वेळ झालेली असताना हॉटेल बंद करण्यास विरोध करत आहे, असे कळविले. फिर्यादी सहकार्‍यासह तेथे पोहचले. फिर्यादी यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तो शिवीगाळ करु लागला. बाहेर थांबलेल्या ग्राहकाला विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादींनी अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची कॉलर सय्यद याने पकडली. पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी त्याला पोलीस ठाण्यात आले. तेथेही तो मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करत होता. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. आपत्कालीन विभागातील डॉ. सुदर्शन यांच्या शर्टची कॉलर त्याने पकडली. त्यांना शिवीगाळ करु लागला. डॉक्टरांनी त्यांचा लेखी अहवाल दिल्यावर त्याच्याविरोधात मद्यपान करुन गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed