Pune Crime News | मोकाच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला कर्नाटकातून अटक
पुणे : Pune Crime News | ताडीवाला रोड (Tadiwala Road Pune) येथील तरुणावर हल्ला करुन खुनाचा प्रयत्न (Attemp To Murder) केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीवर मोका (Pune Police MCOCA Action) कारवाई केली. तेव्हापासून गेले सहा महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेण्यात आले. (Attempt To Murder)
सौरभ तिमप्पा धनगर (वय २४, रा. ताडीवाला रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार ताडीवाला रोडवरील मारुती मंदिर चौकात १८ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी पावणे सात वाजता घडला होता. गणेश संजय पोळ (वय २९) हे त्यांचा मुलगा रोनिक याला घेऊन दुचाकीवरुन घरी जात असताना मारुती मंदिर चौकात सौरभ धनगर, आकाश पंडित व साहिल वाघमारे यांनी त्यांना अडवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फायटर, बांबुची काठी, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत केली.
बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सौरभ धनगर हा फरार झाला होता. पोलिसांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार व पोलीस अंमलदार बडे, भोकर यांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस पथकाने कर्नाटकातील रायचूर येथून पुण्यात आणून अटक केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांनी केली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन